पुणे : पाकिस्तानातील गुंड, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित ५७ जणांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी चौकशी केली. त्याअनुषंगाने पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे टाकण्यात आली. पुण्यातील शिरुर, चाकण, वारजे भागात पोलिसांनी कारवाई करुन चौकशीसााठी काहीजणांना ताब्यात घेतले.
एटीएसच्या पथकाने बुधवारी सकाळपासून ही कारवाई सुरू केली. मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक, जळगाव, तसेच पुण्यात कारवाई केली. भट्टी हा समाज माध्यमातून काही तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. तो तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करत होता. त्यासाठी तो समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करत होता. भट्टी याच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांची बँक खाते, तसेच समाज माध्यमातील खात्यांची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली.
