पुण्याच्या धनकवडीत एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर हल्ला | Attack on youth withdrawing money atm machine crime dhankawadi pune | Loksatta

एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर हल्ला

सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर हल्ला
संग्रहित छायाचित्र

पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणावर तिघांनी शस्त्राने वार केल्याची घटना धनकवडीतील चव्हाणनगर परिसरात घडली. तरुणावर हल्ला करुन तिघे जण पसार झाले असून हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.शिवशंकर थोरात (वय २७, रा. धनकवडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. थोरात याने याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थोरात रात्री सव्वानऊच्या सुमारास चव्हाणनगरमधील निर्मल पार्क इमारतीत असलेल्या एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला होता. एटीएम केंद्रातून पैसे काढून थोरात बाहेर पडला. त्या वेळी तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. थोरात याच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर वैमनस्यातून हल्ला करण्यात आल्याचा संशय असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लोणावळा : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचा कट ; पोलिसांना खोटी माहिती देणारा ताब्यात

संबंधित बातम्या

राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ‘स्वराज्य’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक, संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवरायांचा…”
पुणे : राज्यपालांनी व्यक्त केला पश्चात्ताप…. शिष्टमंडळ भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
मित्रांनी घरी आयोजित केलेल्या पार्टीत नशेच्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार; पुण्यातील वारजेमधील धक्कादायक घटना
मेळघाट सपोर्ट ग्रुपच्या उपक्रमात यंदाही कपडे संकलन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Dutee Chand Marriage: समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह संपन्न, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा
जॉन्सन्सची बेबी टाल्कम पावडर वापरासाठी सुरक्षित; प्रयोगशाळांतील अहवातून स्पष्ट
मुंबई: नायर दंत रुग्णालयात उभारणार अद्ययावत प्रयोगशाळा
मुंबई: नवजात बालकाला इमारतीवरून फेकणाऱ्या महिलेला तीन वर्षांनी जामीन