शरद पवार यांचा आरोप

पुणे : केंद्र सरकारची सक्त वसुली संचालनालय (ईडी) ही यंत्रणा कोणाच्या मागे कधी लागेल, हे सांगता येत नाही. विरोधकांना नाउमेद करण्यासाठी या यंत्रणेचा साधन म्हणून वापर के ला जात आहे. ईडीकडून नाहक त्रास देण्याचा प्रकार सध्या सुरू आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते, माजी के ंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे के ली. काही ठरावीक लोकांच्या हातात कायदा देऊन सहकार क्षेत्र संपविण्याचा घाट घातला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

हडपसर येथील एका नागरी बँके च्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ईडीच्या मुद्दय़ावरून त्यांनी केंद्र सरकावर टीका के ली.

ईडीची कारवाई म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे, ही यंत्रणा कधी कोणाच्या मागे कशी लागेल, हे सांगता येत नाही, असे सांगून पवार म्हणाले की, संस्थांमधील गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम ईडीकडून के ले जाते. मात्र अलीकडे या यंत्रणेचा वापर विरोधकांना नाउमेद करण्यासाठी

के ला जात आहे. संबंधित संस्थेमध्ये ईडी हस्तक्षेप करत आहे. एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी अशा अनेक नेत्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चौकशी सुरू असल्याचे माझ्या ऐकिवात किं वा पाहण्यात नव्हते. राज्याच्या अधिकारांवर गदा येत असल्याने पुढील अधिवेशात हा विषय एकत्रिपपणे मांडण्याचा प्रयत्न के ला जाईल.

नागरी सहकारी बँकांच्या धोरणाबाबतही पवार यांनी टीका केली. रिझव्‍‌र्ह बँके चे नागरी सहकारी बँकांबाबतचे धोरण पाहिले तर या प्रकारच्या बँका बंद पडण्याची भीती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद

वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ले आहे. त्या आवाहनाला पवार यांनी प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने गर्दी होईल, अशा सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाही. करोना संदर्भातील नियमावलीचे पालन होत असेल तरच कार्यक्रमाला उपस्थित राहीन, असे पवार यांनी सांगितले.

‘माझ्या ज्ञानात भर’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम समाजाचे पूर्वज एकच असल्याचे विधान मुंबईत एका कार्यक्रमात के ले होते. त्यावर बोलताना मला ही माहिती नव्याने समजली. या माहितीने माझ्या ज्ञानात भर पडली आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.