scorecardresearch

पुणे : ॲसिड टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार पर्वती पायथा परिसरात कालव्यात ढकलून खुनाचा प्रयत्न

चेहऱ्यावर ॲसिड टाकून कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी देऊन एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

crime
(सांकेतिक फोटो)

चेहऱ्यावर ॲसिड टाकून कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी देऊन एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. महिलेला पर्वती पायथा परिसरातील कालव्यात ढकलून देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी आनंदा पाटील (वय ५६, रा. साईबाबा मंदिराजवळ, गल्ली क्रमांक ५६, जनता वसाहत ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३८ वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील आणि पीडीत महिलेची ओळख होती. पाटीलने तिला आमिष दाखवले. त्यानंतर तिला धमकावण्यास सुरुवात केली. चेहऱ्यावर ॲसिड टाकू तसेच कुटुंबीयांना जीवे मारु, अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.

महिलेला पर्वती पायथा परिसरातील कालव्यात ढकवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुळीक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempted murder by raping a woman by threatening to throw acid pune print news amy

ताज्या बातम्या