लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दारु पितना झालेल्या वादातून मजुराच्या डोक्यात फरशी मारून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना नारायण पेठेतील भिडे पुलाजवळ घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

मृत्युंजय शंकर सिंग (वय २९, रा. भिडे पुलाजवळील पत्र्याची खोली, नारायण पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अश्विन यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सिंग याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नारायण पेठेतील भिडे पूल परिसरात मेट्रोकडून पूल बांधणीची काम सुरू आहे. एका खासगी कंपनीला पूल बांधणीचे काम सोपविण्यात आले आहे. आरोपी यादव आणि सिंग तेथे एका पत्र्याच्या खोलीत राहतात. दोघे बांधकाम मजूर आहेत. दोन दिवसांपूर्वी दोघांनी रात्री दारू प्याली. जेवण केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला.

आणखी वाचा-जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

त्यानंतर वादातून यादवने सिंग याच्या डोक्यात मोठी फरशी घातली. या घटनेत सिंग गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सिंग याला मारहाण करुन यादव पसार झाल्याचे उघडकीस आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड तपास करत आहेत.

Story img Loader