scorecardresearch

पुणे : मुंढव्यात बँकेचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न

मुंढव्यातील केशवनगर परिसरात असलेल्या साधना सहकारी बँकेच्या दरवाजा उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला.

bank
संग्रहित छायाचित्र

मुंढव्यातील केशवनगर परिसरात असलेल्या साधना सहकारी बँकेच्या दरवाजा उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. बँकेशेजारी असलेल्या एका ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा चोरट्यांनी उचकटल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत साधना सहकारी बँकेच्या मुंढवा शाखेतील व्यवस्थापकांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढवा परिसरातील इंगळे पार्क इमारतीच्या तळमजल्यावर साधना सहकारी बँकेची शाखा आहे. बँकेशेजारी बालाजी मेडिको ओैषध विक्रीचे दुकान आहे. मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडले. दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला तसेच शेजारी असलेल्या बालाजी मेडिको ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटण्यात आल्याचे उघडकीस आले.

बँकेचा दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempted robbery by lifting the door of the bank in mundhwa oune print news amy

ताज्या बातम्या