scorecardresearch

पुणे: अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न

अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात घडली.

crime news
गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला म्हणून मित्राने मित्राची केली हत्या

अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात घडली.या प्रकरणी अक्षय राजू चव्हाण (वय २४, रा. मारुती मंदिराजवळ, वडारवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>बोगस डाॅक्टरच्या उपचारामुळे गरोदर महिलेचा मृत्यू

अल्पवयीन मुलीचा आरोपी चव्हाण पाठलाग करत होता.त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. फिरायला जाऊ असे सांगून त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केल्यानंतर त्याने ॲसिड सदृश ज्वलनशील द्रवपदार्थ फेकून तिला मारण्याचा प्रयत्न केला, असे अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:04 IST