गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघां विरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुषमा सुनील रिठे (वय ३२, रा. गंगाधाम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमीत तेलंग, शाहजी रणदिवे, सुकेवानी उर्फ राणी बनसोडे तसेच शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिठे यांचे पती आणि दीर यांनी गंगाधाम रस्ता परिसरात जमीन खरेदी केली आहे.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

आरोपी सुमीत तेलंगने संबंधित जागा वडील दिलीप तेलंग यांच्या मालकीची असल्याचे रिठे यांना सांगितले होते. त्यानंतर रिठे, त्यांची बहीण नीलिमा, आई मुक्ता कांबळे जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी आरोपी तेलंग, रणदिवे, बनसोडे यांनी मारहाण केल्याचे रिठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

तेलंगने भिंतीवर डोके आपटल्याने दुखापत झाली. नगरसेवक बाळा ओसवाल तेथे आले. या जागेचा विषय संपवून टाका. मी ३० लाख रुपयांना जागा खरेदी केली आहे. मी तुम्हाला शेवटची ताकीद देतो. येथून निघून जा, अशी धमकी ओसवाल यांनी दिल्याचे रिठे यांनी फिर्यादीत नमूद केले. मारहाण, धमकावल्या प्रकरणी ओसवाल यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.