पुणे : जमीन बळाकावण्याचा प्रयत्न ; शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघांवर गुन्हा

गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघां विरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
( संग्रहित छायचित्र )

गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघां विरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुषमा सुनील रिठे (वय ३२, रा. गंगाधाम रस्ता, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमीत तेलंग, शाहजी रणदिवे, सुकेवानी उर्फ राणी बनसोडे तसेच शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिठे यांचे पती आणि दीर यांनी गंगाधाम रस्ता परिसरात जमीन खरेदी केली आहे.

आरोपी सुमीत तेलंगने संबंधित जागा वडील दिलीप तेलंग यांच्या मालकीची असल्याचे रिठे यांना सांगितले होते. त्यानंतर रिठे, त्यांची बहीण नीलिमा, आई मुक्ता कांबळे जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी आरोपी तेलंग, रणदिवे, बनसोडे यांनी मारहाण केल्याचे रिठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

तेलंगने भिंतीवर डोके आपटल्याने दुखापत झाली. नगरसेवक बाळा ओसवाल तेथे आले. या जागेचा विषय संपवून टाका. मी ३० लाख रुपयांना जागा खरेदी केली आहे. मी तुम्हाला शेवटची ताकीद देतो. येथून निघून जा, अशी धमकी ओसवाल यांनी दिल्याचे रिठे यांनी फिर्यादीत नमूद केले. मारहाण, धमकावल्या प्रकरणी ओसवाल यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempts grab land crime against shiv sena corporator bala oswal amy

Next Story
भाजपा महाराष्ट्रात स्थिर सरकार द्यायला पुढे येणार का? चंद्रकांत पाटील म्हणाले, “नाही, भाजपाने…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी