पुणे: गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या कार्यालयातून जप्त केलेली कागदपत्रे तसेच गुंतवणुकीसंबंधाची माहिती, कागदपत्रे, ठेवीदारांची यादी याच्यासह अल्प मुदत कर्जधारकांची यादी आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेला त्रुटी आढळून आल्या असून, ही यादी न्यायालयात सादर करण्यापूर्वी त्यामधील त्रुटी दुरुस्ती करण्याचे नियोजन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे. गुंतवणूकदारांनी २९ मेपर्यंत दररोज कागदपत्रे सादर करावीत.

शिवाजीनगर येथील मुख्यालयात सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहापर्यंत कागदपत्रे स्वीकारण्यात येणार आहे,’ अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली.आर्थिक गुन्हे शाखेने ‘ए’ सूचीमध्ये डी. एस. कुलकर्णी यांच्या कार्यालयातील संगणकातून प्राप्त केलेली ठेवीदारांची यादी केली आहे, तर ‘बी’ सूचीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणुकीसंबंधीची माहिती व कागदपत्रे यांसह ठेवीदारांची यादी आहे. ‘सी’ सूचीमध्ये अल्प मुदतीच्या कर्जदारांची यादी आहे.

यादीमध्ये काही ठेवीदारांनी ठेवीच्या पावत्या, स्वतःच्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश, आधारकार्ड फोटोकॉपी सादर केलेली नाही. तर, काही ठेवीदारांची ठेव रक्कम चुकीची नोंद झालेली आहे. ज्यांचे नाव दोन यादीमध्ये नाही आणि डीएसके एमपीआयडी फिक्स डिपॉझिट होल्डर यादीमध्ये आहे; त्यांनी २ ते ७ जूनपर्यंत येऊन कागदपत्रे दाखल करावीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीएसकेडीएल ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. यामधील मुदत ठेवी ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्या आहेत त्यांची नावे एनसीएलटी न्यायालयाकडे पाठविण्यात आलेली असल्याने त्यांची माहिती स्वीकारली जाणार नाही. ‘ए’ सूचीचा आधार घेऊन ‘बी’ आणि ‘सी’ या सूचीमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरुस्त्या केलेली अंतिम यादी २० जूननंतर न्यायालयात सादर केली जाईल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांनी दिली.