पुणे : ‘अरे, आव्वाज कुणाचा’, ’थ्री चिअर्स फॉर.. ’ घोषणांचा निनाद, ढोलाचा गजर, टाळ्या आणि शिट्ट्यांमध्ये औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीओईपी) ‘भानगड’ एकांकिका पुरुषोत्तम महाअंतिम फेरीमध्ये करंडकाची मानकरी ठरली. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या ‘भू-भू’ एकांकिकेने सांघिक द्वितीय तर, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘कुपान’ एकांकिकेने सांघिक तृतीय क्रमांक मिळविला. साखराळे (जि. कोल्हापूर) राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘तुम्ही ऑर नाॅट टू मी’ एकांकिकेने सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक पटकाविला. जल्लोष, सळसळता उत्साह आणि घोषणेने सोमवारी भरत नाट्य मंदिराचा परिसर दुमदुमला. महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडकाच्या अंतिम फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. आयकर विभागाचे आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, महाअंतिम फेरीचे परीक्षक सुबोध पंडे. संजय पेंडसे आणि नितीन धंदुके या वेळी व्यासपीठावर होते. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

पांडे म्हणाले, सांस्कृतिक राजधानीचा पुरुषोत्तम करंडक हा सांस्कृतिक चेहरा आहे. विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे केंद्र असू नये. तर, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे ते व्यासपीठ असले पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १८ जानेवारीपासून देशातील दीडशे विद्यापीठांतील युवक महोत्सवात विजेत्या संघांचा युवक महोत्सव होणार आहे.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

कुंभार म्हणाले, पुरुषोत्तम करंडक ही केवळ स्पर्धा नाही तर आयुष्यभर सोबत करणारी भावना आहे. रंगमंचावरील पहिल्या पावलाला शाबासकी देणारे हे व्यासपीठ आहे. कलावंत होणे सोपे असते. पण, कलावंत म्हणून निभावणे आणि आयुष्यभर कलावंताची मुशाफिरी अनुभवणे हे जगण्याचे मर्म आहे.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट अभिनय – संस्कार लोहार (डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण)

अभिनय नैपुण्य पुरुष – सनी पवार (तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती)

अभिनय नैपुण्य स्त्री – वैष्णवी काळे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद)

सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य – शौनक कुलकर्णी (माॅडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय, पुणे)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल नरवडे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद)

उत्तेजनार्थ पारितोषिक मयूरी निकम, गोविंद रेंगे, शुभम गोविलकर, आकांक्षा पवार, सुजाता सपकाळ, लोकेश मोरे, अमितकुमार मांडवे, स्वानंद कुलकर्णी, संकेत मुंढे, रचना अहिरराव