scorecardresearch

राजकीय संघर्षात फ्लेक्सची भर टाळली; एका दिवसात शहरातील १४०० ठिकाणी कारवाई

राज्यात राजकीय संघर्ष पेटला असताना त्याचेच प्रत्यंतर चौकाचौकातील फ्लेक्सवर उमटत असल्याचे दिसताच पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत शनिवारी दिवसभरात शहरातील १४०० फ्लेक्स तातडीने हटविले.

loksatta
प्रतिनिधीक छायाचित्र

पुणे : राज्यात राजकीय संघर्ष पेटला असताना त्याचेच प्रत्यंतर चौकाचौकातील फ्लेक्सवर उमटत असल्याचे दिसताच पुणे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने धडक कारवाई करत शनिवारी दिवसभरात शहरातील १४०० फ्लेक्स तातडीने हटविले. राज्यात राजकीय संघर्ष पेटलेला असून शिवसैनिकांनी शनिवारी सकाळी आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयाची तोडफोड केली. पालखी सोहळ्याची परंपरा दोन वर्ष खंडित झाली होती. यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आल्यानंतर पालख्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले होते.

राजकीय संघर्षामुळे शहरात टीका करणारे फ्लेक्स लावण्यात आल्यास शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीने महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी फ्लेक्स हटवले. सायंकाळपर्यंत विविध ठिकाणचे १४०० फ्लेक्स हटविण्यात आले.

शहरात फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली. काही भागात कारवाई राहून गेली आहे. नागरिकांना बेकायदा फ्लेक्स तसेच टीका करणारे फ्लेक्स आढळून आल्यास त्यांनी त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात (दूरध्वनी-११२) संपर्क साधावा.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Avoided addition flex political struggles action 1400 places city pune print news ysh

ताज्या बातम्या