पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ, सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता आणि सर्वोत्कृष्ट संशोधक या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सर्वोत्कृष्ट ग्रंथासाठी डॉ. योगिराज बागुल, सर्वोत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून डॉ. चित्रा कुऱ्हे आणि सुभाष वारे, तर डॉ. मिलिंद आवाड यांना संशोधनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

 विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २१ एप्रिल रोजी प्रा. केविन ब्राउन आणि श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या वेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित राहणार आहेत. माजी कुलगुरू प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे माजी प्रमुख प्रा. प्रदीप आगलावे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. कृष्णा महाजन, मुंबई विद्यापीठाच्या आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. अनिल कुमार फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास विभाग प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थीची निवड केली.

dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
mumbai university budget marathi news, mumbai university budget 857 crores marathi news
मुंबई विद्यापीठाचा ८५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

डॉ. योगिराज बागुल यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या ग्रंथाला सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार दिला जाईल. तर डॉ. सोमनाथ कदम यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’, तुकाराम रोंगटे यांच्या ‘आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि डॉ. विलास आढाव यांच्या ‘चिरेबंदी कृषी बाजार आणि दुर्बल शेतकरी’ या ग्रंथांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील.