scorecardresearch

पिंपरीः बाळासाहेबांची शिवसेनेचा उद्या चिंचवडला मेळावा

चिंचवडमधील ॲटो क्लस्टर सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा होणार आहे.

पिंपरीः बाळासाहेबांची शिवसेनेचा उद्या चिंचवडला मेळावा
(संग्रहित छायाचित्र)

पुण्यानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला मेळावा बुधवार (७ डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आला आहे. चिंचवडमधील ॲटो क्लस्टर सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा होणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे हे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यामध्ये मावळ, पिंपरी आणि चिंचवडमधील पदाधिकारी घोषित केले जाणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार बारणे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी पुण्यातही असाच मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्याला लोकांनी जास्त प्रतिसाद दिला नव्हता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:57 IST

संबंधित बातम्या