scorecardresearch

‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मेळाव्याच्या माध्यमातून पक्षातर्फे पहिल्यांदाच जाहीर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

‘बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन; खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
बाळासाहेबांची शिवसेने’चे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन (संग्रहित छायाचित्र)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पुण्यातील पहिला मेळावा उद्या ( ४ डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या मेळाव्याला उपस्थित राहणार असून, अन्य पक्षातील काही कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा- पुणे: भटके-विमुक्त जाती-जमातींचे ११ डिसेंबरला राज्यस्तरीय अधिवेशन

पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी ही माहिती दिली. नाना पेठेतील महात्मा फुले हायस्कूल (अहिल्याश्रम) येथे रविवारी दुपारी चार वाजता हा मेळावा होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, नरेश म्हस्के आदी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षातर्फे पहिल्यांदाच जाहीर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा- भाजप खासदार गिरीश बापट यांच्या वाणीतून काँग्रेसची खंत !

पुणे शहरातील समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती भानगिरे यांनी दिली. तसेच युवासेनेतर्फे लाल महाल ते मेळावास्थळ अशी रॅली काढण्यात येणार असल्याचे युवा सेनेचे किरण साळी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 19:50 IST

संबंधित बातम्या