पुणे: बालेवाडी इथल्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ८ कामगार जखमी

जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्यातील बालेवाडी येथील निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून ८जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार, काल रात्री साडे अकराच्या सुमारास बालेवाडी येथील पाटीलनगर येथे निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचं काम सुरू होते. त्यावेळी कामगारांना काही समजण्याच्या आतमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच, पुणे, पिंपरी चिंचवड आणि एमएमआरडीएच्या अशा एकूण ६ गाड्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ८ जखमी कामगारांना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ही घटना नेमकी कोणता कारणावरून घडली हे अद्याप समजू शकले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Balewadi building slab collapsed in pune 8 injured vsk 98 svk

ताज्या बातम्या