scorecardresearch

पुणे: बंडातात्या कराडकर उपचारासाठी रुग्णालयात

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पक्षघाताचा सौम्य झटका आला असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे: बंडातात्या कराडकर उपचारासाठी रुग्णालयात
बंडातात्या कराडकर(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पक्षघाताचा सौम्य झटका आला असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुण्यात तळजाई पठारावर झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण

वारकरी संप्रदायातील धडाडीचे नेतृत्त्व असा लौकिक असलेले कराडकर व्यसनमुक्ती चळवळ, वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी संस्था या कार्याबरोबरच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करतात. बंडातात्या यांना पक्षघाताचा सौम्य झटका आला असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 20:52 IST

संबंधित बातम्या