पुणे : विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फे डरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना, महाबँक नवनिर्माण सेना यांच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

करोनाची परिस्थिती असतानाही कर्मचारी चांगले काम करत आहेत. बँके ने नव्या शाखा, नव्या योजना आणि सेवा आणल्या, मात्र लिपिक कर्मचाऱ्यांची भरती के लेली नाही. कर्मचाऱ्यांचे मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या जागाही भरलेल्या नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी आवश्यक लिपिक भरती करावी, बँक ग्राहक व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सक्षम करावी, सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करावे, पदोन्नती द्यावी, सर्व शाखा व एटीएमसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारावी, करोना काळातील मनमानी बदल्यांचे धोरण बंद करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

फेडरेशनचे धनंजय कु लकर्णी, महासंघाचे रवींद्र जोशी, कर्मचारी सेनेचे अनंत सावंत, नवनिर्माण सेनेचे राजा पाटील यांच्यासह बँके चे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी धरणे आंदोलन केले.