scorecardresearch

केशकर्तनालय चालकावर शस्त्राने वार; कात्रज भागातील घटना

पिण्यास पाणी न दिल्याने केशकर्तनालय चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली.

केशकर्तनालय चालकावर शस्त्राने वार; कात्रज भागातील घटना
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : पिण्यास पाणी न दिल्याने केशकर्तनालय चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी तिघां जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील तावरे (वय २७, दुगड शाळेसमोर आंबेगाव खुर्द) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे (दोघे रा. शनीनगर, आंबेगाव खुर्द) आणि साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावरे याने याबाबत भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तावरे याचे शनीनगर परिसरात केशकर्तनालय आहे.

हेही वाचा >>> महिलांची छेड काढणारा गुंड तडीपार

आरोपी कांबळे, लोखंडे आणि साथीदार तावरे याच्या केशकर्तनालयात आले. त्यांनी तावरे याला पाण्याची बाटली पिण्यास मागितली. तावरे याने पाणी नसल्याचे आरोपींना सांगितेल. या कारणावरुन आरोपी त्याच्यावर चिडले. कांबळे, लाेखंडे आणि साथीदाराने तावरेला शिवीगाळ करुन मारहाण केली. आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्याने तावरेचा गळा आणि डोक्यावर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक कपले तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 16:56 IST

संबंधित बातम्या