मेळघाटातील बांधवांना सक्षम करण्यासाठी जे अनेकविध उपक्रम राबवले जात आहेत, त्यात नव्याने सुरू झालेला स्नानगृहांच्या उभारणीचा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून या उपक्रमाचा लाभ मेळघाटातील शेकडो कुटुंबांना होणार आहे. पुण्यातील एका कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून केलेले आर्थिक साहाय्य आणि त्याला स्थानिक कुटुंबांच्या मदतीची जोड यातून पाडय़ापाडय़ांवर स्नानगृह उभारणी शक्य झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेळघाटात सुनील आणि निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य ‘संपूर्ण बांबू केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठीही बचतगट आणि अनेकविध उपक्रम चालवले जात आहेत. या भागातील पाडय़ापाडय़ांवर स्नानगृह नसल्याची उणीव सुनील देशपांडे यांना जाणवली आणि त्यातून संस्थेतर्फे स्नानगृह बांधणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला स्थानिक रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील अ‍ॅटलास कॉप्को या कंपनीने उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी- सीएसआर) या संकल्पनेअंतर्गत या उपक्रमाला पंधरा लाख रुपयांचा निधी दिला असून त्यातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bathroom installation program by pune company in villages around melghat
First published on: 07-05-2017 at 04:40 IST