पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली.

ही घटना शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता देहूरोड बाजार येथे घडली. दरम्यान, मारहाणीचा सीसीटीव्ही समोर आला असून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याच सीसीटीव्हीत दिसत आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड (रा. पारशीचाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beating of a police officer in pimpri chinchwad incident captured on cctv msr 87 kjp91

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार