scorecardresearch

पुणे : प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण, समाजमाध्यमावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी

प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली.

सांकेतिक छायाचित्र

पुणे : प्रेमसंबंध तोडून टाकल्याने तरुणीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शकील जिलानी बागवान (रा. खराडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरुणी आणि आरोपी बागवानचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध तोडून टाकल्याने आरोपी बागवान तरुणीवर चिडला होता. त्यानंतर त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग करू लागला. तसेच तिच्या घराजवळ येऊन धमकावण्यास सुरुवात केली. प्रेमसंबंध ठेवण्यास तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. तसेच समाजमाध्यमावर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी दिली.

हेही वाचा : पुणे : जोगत्याचे अपहरण; ताम्हिणी घाटात गोळ्या झाडून खून, संशयावरुन दोघे ताब्यात

मारहाणीनंतर घाबरलेल्या तरुणीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. बागवान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक धायगुडे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Beating of girl due to break up love relationship in hadapsar pune print news pbs