पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. ग्रीन मार्शल आणि महानगर पालिकेत तृतीयपंथीना कंत्राट पद्धतीने नोकरीवर घेतलं आहे. समाज विकास विभागामार्फत हा उपक्रम राबवत असल्याचं महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितलं आहे. भविष्यात देखील या घटकांचा विचार करून नोकरीची संधी दिली जाईल अस आयुक्तांनी म्हटलं आहे. सुरक्षा रक्षाकाची नोकरी मिळाल्याने तृतीयपंथ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथी व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच ठरवलं आहे. त्या दिशेने पाऊल टाकत त्यांनी काही तृतीयपंथी व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली आहे. काही तृतीयपंथी हे ग्रीन मार्शल पथकात रुजू झाले आहेत. तृतीयपंथी म्हटलं की त्यांना एका विशिष्ट नजरेतून पाहिल जातं. सेक्स वर्कर, भीक मागणारे अशी त्यांची ओळख आहे. अस तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांनी सांगितलं. परंतु, तृतीयपंथीना महानगर पालिका मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न करत आहे ते पाहून आनंद होतो आहे अस ही त्यांनी म्हटलं आहे. 

पाहा व्हिडीओ –

तृतीयपंथी व्यक्तींमध्ये देखील अनेक उच्च शिक्षित आहेत. ते नोकरी करतात, अस तृतीयपंथी निकिता यांनी सांगितलं आहे. १७ वर्षांपूर्वी साडी नेसली होते. कधी वाटलं नव्हतं की अशी नोकरी मिळेल. पण महानगर पालिकेने संधी दिली आहे. त्या संधीच सोन नक्की करू. अस तृतीयपंथी रुपाली यांनी म्हटलं आहे. आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, समाज विकास विभागामार्फत तृतीयपंथी या समाजातील घटकासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. रोजगाराबाबत या घटकांना संघर्ष करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून घेतलं आहे. ग्रीन मार्शल पथक आहे त्यात देखील त्यांचा सहभाग आहे. यांची अवहेलना पाहिली तर त्यांना समाजात स्थान देणं महत्वाचं आहे. अस पाटील म्हणाले आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Became a transgender security guard in pcmc kjp 91 amy
First published on: 02-07-2022 at 15:52 IST