आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी आज पिंपरीत महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा प्रचार केला. यावेळी त्यांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ते होतील. असा विश्वास अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्त केला आहे. पिंपरीतून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत- धर यांचे आव्हान आमदार अण्णा बनसोडे यांना असणार आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून राजकीय नेत्यांना आणून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. अण्णा बनसोडे यांच्याकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील पिंपरी विधानसभेत दौरा केला. आज पिंपरी विधानसभेत विनोदी अभिनेते आणि अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी प्रचार केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

हेही वाचा – खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप

भाऊ कदम यांनी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. नागरिकांनी मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून मतदान करावे आणि अण्णा बनसोडे यांना भरघोस मतांनी विजयी करावं असे आवाहन केल आहे. “लई हयगय करायची नाही. दिलेला शब्द टाळायचा नाही.” असा अजित पवारांचा शब्द आहे. विकास पुरुष म्हणून अजित पवारांचं नाव आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील. असं भाऊ कदम आवर्जून म्हणाले.

Story img Loader