कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या चौकशीबाबत माहिती देताना रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं. दुसरीकडे चौकशी आयोगाने तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतलाय.

आजच्या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील अॅड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मात्र, नेमके केव्हा हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते.

Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Sangli, Vishal Patil, vishal patil sangli,
सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल, विशाल पाटलांचा विश्वास; खासदार संजयकाका पाटलांना मैदानात येण्याचे आव्हान
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी
Pune, E Library, Facility Launched Yerwada Central Jail, Inmate, Education, Development,
येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांसाठी ई-लायब्ररीची सुविधा

“विश्वास नांगरे पाटील यांचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश”

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या आजच्या चौकशीविषयी माहिती देताना सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, “१ जानेवारी २०१८ ला जेव्हा कोरेगाव भीमाची घटना घडली तेव्ही विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून ते काम करत होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे असा मागणी अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी केला. त्यावर आयोगाने आदेश केला आहे. तसेच विश्वास नांगरे पाटील यांचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाकडून सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा, एनआयएला झटका देत ‘ही’ मागणी फेटाळली

“रश्मी शुक्ला यांचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र अतिशय सुस्पष्ट”

“सर्व वरिष्ठ अधिकारी कायद्याने बांधलेले आहेत. ते अत्यंत जबाबदारीने काम करतात. रश्मी शुक्ला यांचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र अतिशय सुस्पष्ट आहे. १ जानेवारीच्या घटनेनंतर पुण्यात कोणतीही घटना घडली नाही. कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. या संदर्भात रश्मी शुक्ला यांनी साक्ष दिली आहे. पुढील कामकाज मुंबई येथे २१-२५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होईल,” असंही हिरे यांनी नमूद केलं.