क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या रखडलेल्या कामाने अखेर वेग घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आढावा बैठक घेऊन पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. तसेच येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या कालमर्यादेत काम करण्याची सूचना फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे पावणे दोन कोटींची खंडणी

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
Parbhani Lok Sabha
परभणीत महायुतीचे धक्कातंत्र
hasan mushrif birthday kolhapur marathi news,
मुख्यमंत्र्यांच्या हसन मुश्रीफ यांच्यावरील ‘त्या’ पोस्टने रंगतदार चर्चा; कोल्हापूरकरांनीही दिल्या शुभेच्छा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषणही केले होते. भुजबळ यांच्या मुद्द्यावर निवेदन करताना स्मारकाबाबत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली. इतर मागासवर्ग आणि बहुजन विकास मंत्री अतुल सावे, छगन भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते. तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>पुणे: सीरम कंपनीत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची ४१ लाखांची फसवणूक

राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे, त्यात काय काय असावे या बाबत सूचना भुजबळ यांनी केल्या. सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घेऊन आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.