पिंपरीतील फुले सृष्टीचे आज भूमिपूजन

पिंपरी पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या फुले सृष्टीचे भूमिपूजन मंगळवारी (२३ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे.

पिंपरी : पिंपरी पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या फुले सृष्टीचे भूमिपूजन मंगळवारी (२३ नोव्हेंबर) छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर व नगरसेवक तुषार हिंगे यांनी दिली.

पिंपरीतील आंबेडकर चौकात महात्मा फुले स्मारकात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण फुले सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या प्रकल्पात ३५० आसनक्षमतेचे खुले सभागृह असेल. याशिवाय, विश्रांती कक्ष, बगीचा, कारंजे विविध शिल्पे, वाडा संकल्पना आदींचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून फुले दाम्पत्याच्या कार्याचा प्रसार होईल. तसेच, फुले सृष्टीमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असे हिंगे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhumi pujan flower pimpri ysh

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या