पुणे : बिबवेवाडी भागात १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपट्टू शाळकरी मुलीचा निर्घृण खून करणारा आरोपी शुभम उर्फ ऋषीकेश भागवत याला न्यायालयात फिर्यादीने ओळखले. ‘यानेच आमच्या मैत्रिणीचा गळा चिरला’, अशी साक्ष फिर्यादीने सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात शुक्रवारी दिली.

विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांनी फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली. बिबवेवाडी भागात एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली हाेती. या घटनेत मृत्युमुखी पडलेली शाळकरी मुलगी राष्ट्रीय कबड्डीपटू होती. ती बिबवेवाडी भागात कबड्डीच्या सरावासाठी गेली होती. तेव्हा आरोपी शुभम भागवत दोन मित्रांसोबत दुचाकीवरुन तेथे आला. त्यानंतर त्याने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. ‘तू इथे का आला ?” अशी विचारणा तिने त्याच्याकडे केली. त्यानंतर शुभमने तिच्यावर चाकूने वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदार मित्रांनी तिच्यावर वार केले. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा आरोपी भागवतने तिच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याची धमकी दिली. मुलगी मरण पावल्याची खात्री पटल्यानंतर तो साथीदारांसोबत घटनास्थळावरुन पसार झाला. भागवतने आमच्या मैत्रिणीचा गळा चिरला, अशी साक्ष फिर्यादीने दिली. विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांनी फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.

Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक

हेही वाचा – क्वांटम तंत्रज्ञानासाठी नवउद्यमींना केंद्र सरकारचे बळ; देशातील आठ स्टार्टअप्समध्ये राज्यातील दोन स्टार्टअप्स

हेही वाचा – बचाव मोहिमांमधून ४१९ कासवांना जीवदान, वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये उपचार

न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपी भागवतला येरवडा कारागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ काॅन्फरसिंग) हजर करण्यात आले. एकतर्फी प्रेमातून भागवत आणि त्याच्या साथीदारांनी मुलीवर तब्बल ४२ वार करुन तिचा खून केला होता. याप्रकरणी आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी शुभम बाजीराव भागवत (वय २२) याच्याविरुद्ध खून, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Story img Loader