पुणे : पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने लोहगाव परिसरात छापा टाकून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना शंकरशेठ रस्त्यावर पकडले, सराइतांकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त

हेही वाचा – पुणे : ठशांवरुन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा माग, मार्केट यार्ड परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघड

श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे नावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदजे अबनावे आणि बेंडे यांच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाले होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. तिघांकडून एक कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.