महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने डिसेंबर २०२२ या एकाच महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यात वीजचोरीच्या ८७९ प्रकरणात ११ कोटी ६९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. पुण्यात दोन ‘स्टोन क्रशर’ व्यावसायिकांकडून होणारी सर्वांत मोठी वीजचोरी उघड झाली आहे.

हेही वाचा >>>पुणे: “कुस्त्या पाहण्यास CM आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ,पण आंदोलनाकडे पाठ”; MPSC विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. वीजचोरीशिवाय इतर अनियमितता असलेल्या एकूण ५३९ प्रकरणांमध्ये १३ कोटी ६७ लाख ६० हजार रुपयांची वीजदेयकेही देण्यात आली. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबतची माहिती दिली. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या ६३ भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली.

हेही वाचा >>>पुणे : आता लक्ष्य ऑलिम्पकचे अभिजीत कटकेचे मनोगत

वीजचोरी पकडलेल्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. पुण्याजवळ वाघोली येथे भरारी पथकाने छापा टाकला असता दोन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. त्यांना १ कोटी ४४ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये एका औद्योगिक ग्राहकाला ३१ लाख ६५ हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल दिले. जालना जिल्ह्यात एका स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली व संबंधितांना ५१ लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले.