मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतिक लक्ष्मण पवार (वय २५, रा. खोपी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

हेही वाचा- संशोधन संस्थेतील प्रसाधनगृहात युवतीचे मोबाइलवर चित्रीकरणाचा प्रयत्न; पसार आरोपीचा शोध सुरू

thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

दुचाकीस्वार ऋतिक सकाळी आठच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन कामाला निघाला होता. बाह्यवळण मार्गावरील कोळेवाडी परिसरात भरधाव वाहनाने दुचाकीस्वार ऋतिकला धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या ऋतिकचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

हेही वाचा- पुणे: निम्मा डिसेंबर कडाक्याच्या थंडीविना; दोन दिवसांत तापमानात काही प्रमाणात घट

पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत. बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र कायम आहे. गेल्या महिन्यात एका आठवड्यात सात गंभीर स्वरुपाचे अपघात झाले हाेते. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या हाेत्या.