पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी भागात घडली. पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध खडकी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
रमेश बुग्या लावुड्या (रा. शास्त्रीनगर, ज्ञानराज चौक, पिंपरी-चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रमेश यांचा भाऊ गणेश (वय ३५, रा. पिंपळे सौदागर) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रमेश मुंबई-पुणे रस्त्याने निघाले होते. बोपोडीतील गोपी चाळीसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार रमेश यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या रमेश यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.