scorecardresearch

पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; तीन गुन्हे उघड

सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली.

पुणे : सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणारा अटकेत ; तीन गुन्हे उघड
( संग्रहित छायचित्र )

सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहे.
शिवकुमार जयभीम दोडमणी (वय २५, रा. शिवतीर्थनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दोडमणीने सिंहगड रस्ता भागातून दुचाकी चोरली होती. तो रघुनंदन हॅाल परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी अविनाश कोंडे, सागर शेंडगे यांना मिळाली. त्यानंतर दोडमणीला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोडमणीने दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> शाळकरी मुलीवर तरुणाकडून बलात्कार; आरोपीस अटक

दोडमणीने सिंहगड रस्ता परिसरातून दोन दुचाकी तसेच मार्केट यार्ड भागातून एक दुचाकी चोरल्याची तपासात उघड झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, आबा उत्तेकर, संजय शिंदे, शंकर कुंभार, अमेय रसाळ, विकास बांदल, अमित बोडरे, राहुल ओलेकर आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या