मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अटकेत; अल्पवयीन मित्र ताब्यात; पाच दुचाकी जप्त

मौजमजेसाठी अल्पवयीन मित्राच्या मदतीने दुचाकी चोरणाऱ्या एकाला गु्न्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने पकडले.

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अटकेत; अल्पवयीन मित्र ताब्यात; पाच दुचाकी जप्त
संग्रहित छायाचित्र

पुणे : मौजमजेसाठी अल्पवयीन मित्राच्या मदतीने दुचाकी चोरणाऱ्या एकाला गु्न्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

आदित्य आत्माराम म्हस्के (वय १९, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाकडून हडपसर भागात गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी हिंगणे मळा परिसरात दोघेजण थांबले असून त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना मिळाली.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघानी लोणी काळभोर, भोसरी, चंदननगर, दौंड भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याक़डून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय काळभोर, राजेश अभंगे, दिनकर लाेखंडे, विनायक रामाणे, शिवाजी जाधव, अमोल सरतापे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bike thief arrested minor friend custody five bikes seized pune print news ysh

Next Story
स्वातंत्र्यदिनी पावसाची शक्यता; दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधारांचा अंदाज
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी