लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्डन चौकात घडली. याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Dabhol - Mumbai ST bus skidded off road and overturned at Chinchali Dam
दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम
worker dies after falling from terrace case registered against contractor for negligence
गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

अशोक देवबहाद्दुर घर्ती (वय ३२, रा. आनंद पार्क, गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालक रवींद्र गेनबा गायकवाड (वय ४०, रा. श्री स्वामी समर्थ हाइट्स, आंबेगाव पठार, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अशोक घर्ती यांचा भाऊ गोपाल (वय ३३) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-शहरातील पदपथांचे लेखापरिक्षण करणार? काय आहे कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अशोक घर्ती बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होता. चंदनगर भागातील टाटा गार्डन चौकात भरधाव पीएमपी बसने दुचाकीस्वार घर्ती यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घर्ती यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.

नगर रस्ता वर्दळीचा असून, या रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश अपघात वेग आणि वाहनचालकांच्या चुकांमुळे होतात.

Story img Loader