“राहुल गांधींची मानसिकता राजेशाही-घराणेशाहीची”, भाजपा पधाधिकाऱ्यांची टीका; पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन

राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते, अशी टीका पिंपरी-चिंचवडच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

BJP agitation against Rahul Gandhi
"राहुल गांधींची मानसिकता राजेशाही-घराणेशाहीची", भाजपा पधाधिकाऱ्यांची टीका; पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

“काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी’ या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते”, अशी टीका पिंपरी-चिंचवडच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

‘मोदी’ आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात आले. सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, नामदेव ढाके, अमित गोरखे, वीणा सोनवलकर, सदाशिव खाडे यांनी आपल्या भाषणात तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

हेही वाचा – वॉशिंग सेंटर चालकाला मारहाण प्रकरण; भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेविकेसह १६ जणांविरुद्ध गुन्हा

सदाशिव खाडे म्हणाले की, ‘मोदी’ या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेसचे नेते न्यायालयाने राहुल गांधी यांना कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नाहीत.

भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख वीना सोनवलकर म्हणाल्या की, न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल.

हेही वाचा – नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे साडेसात हजार झाडे बाधित; महापालिका ६५ हजार देशी झाडे लावणार

आंदोलनात नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, राजेंद्र लांडगे, संगीता भोंडवे, अश्विनी चिंचवडे, शर्मिला बाबर, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख वीणा सोनवलकर, प्रकाश जवळकर, समीर जावळकर, देंवदत्त लांडे, निखिल काळकुटे, कविता हिंगे, कोमल शिंदे, महादेव कवितके, विजय शिनकर, धनंजय शाळीग्राम, सुभाष सरोदे, फारूक इनामदार, योगेश चिंचवडे, नंदू दाभाडे, माणिक फडतरे, नंदू कदम, विनायक गायकवाड, महेंद्र बाविस्कर, किसन बावकर, संतोष मोरे, मुकेश चुडासमा, देविदास पाटील, गणेश वाळुंजकर, बाळासाहेब भुंबे आदी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 20:59 IST
Next Story
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे साडेसात हजार झाडे बाधित; महापालिका ६५ हजार देशी झाडे लावणार
Exit mobile version