दोन आठवड्यांपूर्वी समोर आलेल्या पुणे बलात्कार प्रकरणावरून सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळातलं वातावरण तापलं आहे. कारण या गुन्ह्यामध्ये शिवसेना नेते रघुनाथ कुचिक हे आरोपी आहेत. कुचिक यांच्याविरोधात १६ फेब्रुवारी रोजी २४ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि नंतर तिचा गर्भपात करवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतर लागलीच त्यांना जामीन देखील मंजूर झाला. या प्रकरणावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, या प्रकरणात लक्ष घालून पीडितेला न्याय मिळवून देण्याचं साकडं चित्रा वाघ यांनी शरद पवारांना घातलं आहे.

“एक मुलगी पुढे येऊन बोलतेय. आम्ही तिच्या पाठिशी ताकदीने उभे आहोत. मी गृहमंत्र्यांना सांगणार आहे की या प्रकरणाचा पहिल्यापासून आढावा मागवा. सहा महिन्यांत न्याय देण्याचं काम सरकारने याआधीही केलं होतं. तशीच भूमिका या प्रकरणात देखील सरकारने घेतली पाहिजे. जर तसं नाही झालं, कर या मुलीसारखी दुसरी कुठली मुलगी पुढे येऊन बोलणार नाही”, असं चित्रा वाघ यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

“लाजच वाटली पाहिजे”

“ज्यानं बलात्कार केलाय, तो मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षाचा पुण्यातला नेता आहे. कुणालाही वाटलं नाही त्या मुलीला धीर द्यायला हवा. कारण तो सत्ताधारी पक्षाचा आहे. तो कोणत्या पक्षाचा नसून नराधम आहे. त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. लाजच वाटली पाहिजे”, असं देखील चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

पुणे: शिवसेना नेत्याविरोधात बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल; लग्नाचं आमिष दाखवून केले अत्याचार

“माझी शरद पवारांना विनंती आहे, की…”

दरम्यान, पीडित मुलीला शरद पवारांपर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये, असा आरोप चित्रा वाघ यांनी यावेळी केला. “ती सगळ्यांकडे गेली. पण तिला शरद पवारांपर्यत पोहोचू दिलं नाही. ती शरद पवारांपर्यंत पोहोचली असती, तर तिला न्याय मिळाला असता. माझी त्यांना विनंती आहे की कृपया या प्रकरणात लक्ष घाला. यात दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक शिवसेनेचा नेता आहे”, असं त्या म्हणाल्या.

पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलीस आणि पोलीस आयुक्त आरोपींना वाचवण्याचा जाणून-बुजून प्रयत्न करत असल्याचा दावा देखील चित्रा वाघ यांनी केला. “ज्या पीडिता हिंमत दाखवून पुढे येतात, त्यांच्यामागे सगळ्याच यंत्रणांनी उभं राहायला हवं. पण दुर्दैवानं तसं होत नाही. कुणालाही या घटनेची दखल घ्यावीशी वाटली नाही. कारण तो शिवसेनेचा नेता आहे आणि कोणत्यातरी महामंडळावर राज्यमंत्री आहे. पुणे पोलिसांचं तर कौतुकच आहे. सगळ्याच ठिकाणी तातडीने कारवाई होते. पण राज्य सरकारशी संबंधितांच्या केसेसमध्ये त्यांना वाचवण्यासाठी लागलीच पुढाकार घेतला. पुणे आयुक्तांची तर यात पीएचडी आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.