पुणे : भारतीय जनता पक्षाच्या मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ही निवड करताना नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. एक लाख ते सव्वा लाख मतदारांच्या मागे एक मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात आल्याने मंडल अध्यक्षांची संख्याही वाढली आहे.हडपसर विधानसभा मतदारसंघात चार, कसबा, शिवाजीनगर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन-तीन, वडगावशेरीमध्ये चार, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दोन, पर्वती मतदारसंघात तीन आणि खडवसाला मतदारसंघात चार अशा एकूम २६ मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.

लोहगाव-धानोरीसाठी संदीप मोझे, विमाननगर-सोमनाथनगरसाठी नितीन जाधव, खराडी वडगावशेरीसाठी आशिष देशमुख आणि येरवड्यासाठी रमेश चव्हाण यांची वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवड करण्यात आली आहे. शिवाजीनगर दक्षिणसाठी शैलेंद्र बडदे, शिवाजीनगर उत्तराठी आनंद छाजेड, खडकीसाठी शाम काची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोथरूड मतदारंसघात कोथरूड उत्तरसाठी (बाणेर बालेवाडी पाषाण) लहू बालवडकर, कोथरूड मध्येसाठी नीलेश कोंढाळकर, कोथरूडसाठी (एरंडवणे, कर्वेनगर) कुलदीप सावळेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पर्वती मतदारसंघाअंतर्गत सिंहगड रस्ता परिसरासाठी राजू कदम, मार्केट यार्ड मंडलासाठी निखिल शिळीमकर, तळजाई मंडलासाठी प्रशांत थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट अंतर्गत कोरेगाव पार्क घोरपडी वानवाडी डायस प्लॉट आणि पुणे कॅन्टोन्मेंटसाठी सुशांत निगडे, ससून-पुणे रेल्वे स्थानक- ताडीवाला रस्ता- भवानी रोड -काशीवाडी- सोमवार पेठ मंगळवार पेठ – रास्ता पेठ मंडलासाठी विशाल कोंडे यांना संधी देण्यात आली आहे.

कसबा गणपती मंडलासाठी अमित कंक, समता भूमी मंडलासाठी छगन बुलाखे, क्रांतीवीर उमाजी नाईक मंडलासाठी प्रशांत सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धनकवडी बालाजीनगरसाठी महेश भोसले, वारजे – बावधन – भुसारी परिसरासाठी गणेश वर्पे, वडगाव बुद्रुक – धायरी मंडलासाठी यशवंत लायगुडे, धायरी-शिवणे मंडलासाठी रूपेश घुले, कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रुक परिसरासाठी प्रमोद टिळेकर , कोंढवा खुर्द, एनआयबीएम रस्ता, मोहम्मदवाडी मंडलासाठी अमर गव्हाणे, घोरपडी, मुंढवा, मगरपट्टा, केशव नगर, माळवाडी, साडे सतरा नळी, भोसले गार्डन मंडलासाठी संदीप लोणकर, वैदूवाडी, रामटेकडी, काळेपडळ, ससाणेनगर हडपसर गाव मंडलसाठी आकाश डांगमाळी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.