राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरी वस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरुन जनजिवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली, तसेच काही ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जीविहितहानी झाली आहे. अनेक जण बेघर झाले, तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा नुकसानग्रस्त भागात उपाययोजना व मदतीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहीती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातुन, विविध पातळीवरून मदतकार्य सुरु झाले आहे. तेथील नागरिकांच्या मदतीसाठी स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजनांकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

बँका, विमा कंपन्यांमध्ये ४९ हजार कोटी धुळखात पडून; खातेदार आलेच नाहीत, केंद्राची संसदेत माहिती!

दरम्यान, आज मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोकणात काही जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यात घरगुती वापराच्या वस्तू, सॅनिटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं.

युरोपातलं सर्वात उंच हिमशिखर सर करणारी पुण्यातली बाप-लेकीची जोडी हिट

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता अनेक राजकीय नेते दौरे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना अशा भागामध्ये दौरे न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाशी आपण सहमत असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.