पुण्यातील भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक महिन्याचं मानधन देणार

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

Muralidhar Mohol
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात मागील काही दिवसांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातलं आहे. यामुळे ज्या भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तेथील नागरिकांच्या आर्थिक मदतीसाठी पुण्यातील भाजपा नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकाचं एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

या विषयी माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात महापुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून असंख्य नागरिक जखमी देखील झाले आहेत. त्यात शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यातून बाहेर येण्यास काळ लागणार आहे. हे लक्षात घेऊन, तेथील नागरिकांसाठी आर्थिक मदत म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp corporator in pune to pay one months honorarium to help flood victims msr 87 svk