मागील काही महिन्यापासून केंद्र सरकार मार्फत सतत पेट्रोल,डिझेल आणि गॅस दरवाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यावर सत्ताधारी भाजपकडून कोणताही नेता भूमिका मांडत नाही. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे दौर्‍यावर आले असतांना महागाईबाबतची भूमिका स्पष्ट करत एक प्रकारे पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ” वाढत्या महागाईच एक कारण म्हणजे भ्रष्टाचार असून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अधिकारी जे पैसे लुटण्याच काम करतात, तो पैसा तेथूनच येत आहे” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : “उद्धव ठाकरेंच्या ३३ गुंडावर…” ‘त्या’ हल्ल्याचा उल्लेख करत किरीट सोमय्यांचं सूचक विधान

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’

“पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढी सांगायचे झाल्यास यूक्रेन युद्धाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य नियोजन करून रशियासोबत करार केला. त्यावेळी पाकिस्तान, श्रीलंका या देशात प्रचंड भाववाढ झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया सोबत करार केल्यामुळेच आपल्याकडे भाववाढ नियंत्रणात ठेवू शकलो” असं सांगत वाढत्या महागाई बाबत केंद्र सरकारकडून योग्य ती पावलं उचलली जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

हेही वाचा >>> पुणे : “संजय राऊत म्हणत होते, ते हेच दंगे….”, किरीट सोमय्यांचं पुण्यातून टीकास्र

कोणाचाही तपास किंवा चौकशी बंद झाली नाही

किरीट सोमय्या खासदार भावना गवळी शिंदे गटात आल्यावर ईडी मार्फत सुरू असलेली चौकशी बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, ही बाब न्याय प्रविष्ट असून त्यावर बोलण उचित नाही. पण कोणाचीही चौकशी किंवा तपास बंद झाला नाही. तपास हा यंत्रणा मार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.