पुणे : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महाअधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार होते. मात्र गडकरी यांच्या अनुपस्थितीत अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे गडकरी यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली. हेही वाचा: उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी, बावनकुळे यांचा घणाघात बालेवाडी येथील क्रीडा संकुलात भाजपचे अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यभरातून सहा हजारांहून अधिक कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी झाले आहेत. तसेच राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांनी अधिवेशनाला हजेरी लावली आहे. अधिवेशनाच्या नियोजनानुसार नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार होती. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.