Jaykumar Gore Car Accident: भारतीय जनता पार्टीचे आमदार व सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहे. गोरे यांच्या प्रकृतीबद्दल रुबी रुग्णालयातील न्यूरो ट्रॉमा विभाग, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे यांनी गोरे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना झिपरे यांनी गोरेंच्या ‘प्रकृतीला कोणताही धोका नाही’ असं सांगितलं.

गोरेंना मुकामार लागल्याचंही डॉक्टर म्हणाले. डॉक्टरांनी गोरेंच्या प्रकृतीबद्दल सविस्तर माहिती दिल्यानंतर गोरे यांच्या निकटवर्तीयांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी “मेडिकल पॅरामिटर सगळे योग्य असल्याने चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते शुद्धीवर आहेत. बोलत आहेत, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे,” असं गोरेंच्या समर्थकांनी सांगितलं. कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यांना काही आवाहन करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, “त्यांना भेटू देणार नसल्याने कार्यकर्त्यांनी मतदारसंघात आणि जिल्ह्यातच थांबावं. इकडं (पुण्याला रुबी रुग्णालयात) येऊ नये अशी विनंती हॉस्पिटल प्रशासनानं केली आहे,” असं या समर्थकांनी सांगितलं.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड

नेमका अपघात कशामुळे झाला याबद्दल बोलताना, “काल आम्ही नागपूरवरुन पुण्यात आलो. पुण्यावरुन त्यांच्या गावी जाताना फलटणजवळ गाडी पुलावरुन कोसळली. समोरचं वाहन जवळ आल्यामुळे कदाचित ते झालं अशी प्राथमिक माहिती आहे,” असं गोरेंच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. तसेच अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये गोरेंबरोबर चालक, दोन सुरक्षारक्षक, एक खासगी सचिव होते, अशीही माहिती देण्यात आली. यापैकी चालक आणि खासगी सचिवांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या समर्थकांनी दिली.

गोरे यांनी ज्या स्थानिक सहकाऱ्याला अपघातानंतर फोन करुन मदत मागितली त्यांनीही नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. “जयकुमार गोरे यांचा ३ वाजून पाच मिनिटांनी फोन आला की गाडीचा अपघात झालेला आहे. लोकेशन सांगता येणं शक्य नाही पण फलटणच्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलं. मी ती पाच ते सहा मिनिटांमध्ये तिथे पोहोचलो. घटनास्थळी गेलो तेव्हा गाडी ७०-८० फूट खाली पडल्याचं दिसलं,” असं गोरे यांना अपघातानंतर मदत करण्यासाठी पोहोचलेल्या या समर्थकाने सांगितलं.

नक्की वाचा >> Jaykumar Gore Car Accident: “त्यांच्या छातीला डाव्या बाजूला…”; आमदार गोरेंच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती

“ती गाडी वरुन आपटल्याने गाडीतील सीट वगैरे तुटले होते. गोरेसाहेब बसतात त्याच बाजूने गाडी आपटली. चालक आणि पीएला गंभीर दुखापत होती. गोरे स्वत: बाहेर आले होते. पुढल्या पाच ते सहा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका आल्या. त्यांना सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आलं,” असं गोरेंना मदत करण्यासाठी पोहचलेल्या या समर्थकाने प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्याचप्रमाणे, “गोरेंनी आधी अंगरक्षक, पीए आणि चालकाला रुग्णवाहिकेतून पुढे पाठवून दिलं आणि स्वत: शेवटच्या रुग्णवाहिकेतून गेले. त्यांच्या तीन बरगड्यांना दुखापत झाली आहे. ते लवकरच बरे होतील. ते व्यवस्थितपणे बोलत आहेत. त्यांना कुठलीही अडचण वाटत नाही,” असंही या निकटवर्तीयाने सांगितलं.

तसेच गोरे यांच्या गाडीच्या मागेपुढे ताफ्यातील इतर कोणतीही गाडी नव्हती. गोरेंची एकच गाडी होती, असंही या समर्थकांनी सांगितलं. त्याचप्रमाणे लवकरच गोरे बरे होऊन माणला पोहचतील असा विश्वास या समर्थकांनी व्यक्त केला.