bjp planning to focus on booth centers in kasba peth assembly constituency pune print news apk 13 zws 70 | Loksatta

पुणे : कसब्यात’ बूथ, शक्ती केंद्रांवर भाजपची भिस्त

कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण २७० बूथकेंद्र आणि ७४ शक्तिकेंद्रांचा समावेश आहे.

bjp candidate Kasba, Chinchwad assembly by elections,
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पारंपारिक कसबा विधानसभा मदारसंघ ‘राखण्यासाठी’ भारतीय जनता पक्षाची भिस्त बूथरचनेवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठीचे सूक्ष्म नियोजन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे. प्रत्येक बूथसाठी बूथप्रमुख आणि पंचवीस सदस्यांची यादी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.

कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीची बैठक झाली. त्यामध्ये बूथ आणि शक्ती केंद्र सक्षमीकरणावर प्राधान्य देण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : कसब्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी; बाळासाहेब दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण २७० बूथकेंद्र आणि ७४ शक्तिकेंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक बूथसाठी बूथप्रमुख आणि पंचवीस सदस्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटक आणि संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.

एका शक्तिकेंद्रात तीन ते चार बूथचा समावेश आहे. सर्व ७४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. एक माजी नगरसेवक आणि एका शहर पदाधिकार्याच्या बरोबर शक्तिकेंद्र प्रमुख काम करणार आहेत. मतदारसंघात सहा प्रभाग असून त्यांची जबाबदारी आजी-माजी आमदारांना देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात निवडणूक व्यवस्थापनासाठी शहरातील अन्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मदत करणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणूक: ” मला अजित पवार नाही, तर जनता आमदार करणार”; बंडखोर नेते राहुल कलाटेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

सदाशिव-शनिवार पेठ या प्रभाग क्रमांक पंधराची जबाबदारी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना कोथरूड मतदारसंघाती कार्यकर्ते मदत करणार आहेत. कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागाची जबाबादरी सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे असून रास्ता पेठ-रविवार पेठेची जबाबादीर योगेश टिळेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. खडकमाळ आली-महात्मा फुले पेठ प्रभागासाठी माजी बापू पठारे यांची नियुक्ती करण्यात आली असून कासेवाडी-लोहियानगर आणि दत्तवाडी-नवी पेठ या अनुक्रमे प्रभाग क्रमांक एकोणीस आणि एकोणतीससाठी आमदार सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. या यंत्रणेला महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्तेही जोडले जाणार आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 23:15 IST
Next Story
पुणे :ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील उपअभियंत्याला लाच घेताना पकडले