अशा वेळी भाजपाची सहानुभूती कुठे गेली?
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे मृत्यूशी झुंज देत होते. तेव्हा, तीन महिन्यापासून भाजपा चिंचवड पोटनिवडणूकीची तयारी करत होती. असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांची चिंचवड पोटनिवडणूकी संदर्भात जगताप यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे पिंपळे गुरव येथे बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्यावर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची धुरा सांभाळणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा >>> पुणे : राज्यातील शिक्षक भरतीसाठीची बहुप्रतीक्षित अभियोग्यता चाचणी जाहीर
भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन जानेवारी रोजी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. चिंचवड मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने चिंचवड पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सर्व पक्षीय नेते कामाला लागले आहेत. आज राष्ट्रवादी ची पिंपळे गुरव या ठिकाणी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे. तशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी अटकेत; ईडीच्या तपासात असहकार्य, पुरावे नष्ट केल्याचा आरोप
बैठकीनंतर आमदार सुनील शेळके म्हणाले की, पंढरपूर येथे पोटनिवडणूक लागली तेव्हा भाजपाने सहानुभूती चा विचार केला नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेवट चे क्षण मोजत होते. तेव्हा, भाजपाने तीन महिन्यापासून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची तयार सुरू केली. अशा ठिकाणी सहानुभूती चा विचार करावा का? असा प्रश्न उपस्थितीत करत आमदार शेळके यांनी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे. पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी उमेदवारीसाठी दावा केला असला तरी राष्ट्रवादी ची ताकद या चिंचवड मतदारसंघात आहे. महाविकास आघाडी चा विचार करत असताना नक्कीच पक्षश्रेष्ठी राष्ट्रवादी च्या उमेदवाराचा विचार करेल. राजकीय डाव म्हणून पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला जातो. पण आता पुरस्कृत करण्याची गरज नाही असे देखील सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
महेश लांडगे ऑन सुनील शेळके आरोप
भाजपा 365 दिवस निवडणुकीची तयारीच करत असतो, त्यामुळं आम्ही असंवेदनशील आहोत. असं म्हणणं चुकीचं आहे. असे स्पष्टीकरण भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिले आहे.