पुणे : काळी जादू केल्याची भीती दाखवून एकाने बालेवाडी भागातील ज्येष्ठ महिलेची २८ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय ज्येष्ठ महिला बालेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एकाने ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘तुमच्या घरावर काळी जादू करण्यात आली आहे. घरात वास्तूदोष आहे. तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो,’ अशी बतावणी केली. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून तिला काळ्या जादूची भीती दाखविली. घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही विधी कराव्या लागतात, असे सांगून महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले.

महिलेने एका बँक खात्यात वेळोवेळी २८ लाख ७७ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black magic fear women senior citizen cheated balewadi pune print news rbk 25 ssb