scorecardresearch

पिंपरी-चिंचवडमध्ये जिलेटिन काड्यांचा स्फोट घडवून फोडलं एटीएम

ब्लास्ट इतका मोठा होता की एटीएम मशीन स्फोटात उद्ध्वस्त झाली

पिंपरी-चिंचवडमध्ये जिलेटीनच्या काड्यांचा स्फोट घडवून एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी एटीएममधील पैसे लुटण्याचा उद्देशाने ब्लास्ट केल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे. ब्लास्ट इतका मोठा होता की एटीएम मशीन स्फोटात उद्ध्वस्त झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात असणारे कॅनरा बँकेचे एटीएम दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी ब्लास्ट घडवून फोडले आहे. स्फोटासाठी जिलेटीन काड्यांचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोट फार मोठा असल्याने त्यात एटीएम चक्काचूर झाले आहे. घटनास्थळी चिखली पोलीस, BDDS ची टीम दाखल झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blast in atm in pimpri chinchwad kjp 91 sgy

ताज्या बातम्या