पुण्यातील गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे मंडळ जाहीर

संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची व्यवस्थापन समितीची निवडणूक घेताना संस्थेचे लेखापरीक्षक, कर्मचारी किंवा संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळातील सदस्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करता येणार नाही.

पुणे : जिल्ह्यातील २५० किं वा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नामतालिके ला मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी प्रसृत के ले आहेत. त्यानुसार १५१ निवडणूक अधिकाऱ्यांचे मंडळ (पॅनेल) निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून या संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांच्या कामकाजाला गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार गृहनिर्माण संस्थांची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

   मंडळात प्रमाणित लेखापरीक्षक, बार कौन्सिलचे वकील, सहकारी गृहनिर्माण संस्थेवर व्यवस्थापक म्हणून काम केलेले, साखर कारखाने, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूक व गृहनिर्माण संस्थांशी संबंधित न्यायिक कामकाजाचा अनुभव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निवडणूक पथकात कार्यरत, पतसंस्थेवरील व्यवस्थापक, सहकारी संस्थांचे द्वितीय अपर विशेष लेखापरीक्षक, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, राज्य सहकारी संघावरील सहकार शिक्षणाधिकारी आदींचा समावेश आहे. प्राधिकरणाने जाहीर के लेली नामतालिका मंजुरीपासून तीन वर्षे वैध राहणार आहे.

   दरम्यान, संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची व्यवस्थापन समितीची निवडणूक घेताना संस्थेचे लेखापरीक्षक, कर्मचारी किंवा संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळातील सदस्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे फे डरेशन किं वा शासनाने अधिसूचित के लेल्या प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. याबाबत पुणे विभागीय सहनिबंधकांनी खातरजमा करावी. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य हे निवडणुकीपूर्वीच्या लगतच्या मार्चपूर्वी २५० किं वा त्यापेक्षा कमी असल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गृहनिर्माण संस्थांचा आढावा

जिल्हा उपनिबंधक (शहर) शहर कार्यालयांतर्गत १७ हजार १४८ गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामध्ये २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी संस्थांची संख्या २२०, तर २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या संस्थांची संख्या १६ हजार ९२८ एवढी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Board of returning officers for the elections of housing institutions in pune akp