.पिंपरी- चिंचवडमधून ३१ डिसेंबरच्या दुपारी बेपत्ता झालेल्या वकिलाचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवशंकर शिंदे अस मृत झालेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांचं काळेवाडी येथे ऑफिस आहे. तिथून ते बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलीस शोध घेत असतानाच त्यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या आहे का? या बाजूने देखील पिंपरी- चिंचवड पोलीस तपास करत आहेत. 

हेही वाचा- पुणे, नवी मुंबईत दुचाकी चोरणारे गजाआड, ४ दुचाकी जप्त

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

३१ डिसेंबर २०२२ रोजी वकील शिवशंकर हे त्यांच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क केला मात्र तो होऊ शकला नाही. मग, वाकड पोलिसात जाऊन तक्रार नोंदवण्यासाठी गेले. तिथं, वाकड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर, उशिरा ही शिवशंकर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी तपास देखील सुरू केला. काही तास उलटले नाहीत तोपर्यंत शिवशंकर यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे आढळला आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस हे शिवशंकर यांची अपहरण करून हत्या तर झाली नाही. या दिशेने देखील तपास करत आहेत. 

हेही वाचा- पुणे : फक्त शंभर रूपये न दिल्याने टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा हात मनगटापासून कापला

मृत वकिलाच्या कार्यालयात झटापट; रक्त ही होते सांडलेले!

मृत शिवशंकर यांच्या काळेवाडीतील ऑफिसमध्ये त्यांच्याशी अज्ञात व्यक्तीने झटापट केल्याचा संशय पोलिसांना आहे. तिथं, तुटलेली बटन आणि रक्त आढळलं आहे. यामुळं त्यांचं अपहरण करून तर हत्या केली नाही ना असा संशय पोलिसांना आहे. त्याचा उलगडा करणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. सीसीटीव्हीद्वारे त्याचा तपास पोलीस करत आहेत.