scorecardresearch

पुणे : लोहगावमध्ये बोगस डॉक्टरला पकडले, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई

महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी न करता होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोहगाव परिसरातील बाेगस डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (२५ फेब्रुवारी) कारवाई केली.

bogus doctor caught Lohgaon
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी न करता होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोहगाव परिसरातील बाेगस डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (२५ फेब्रुवारी) कारवाई केली. या प्रकरणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा – भाजपा उमेदवार रासनेंनंतर मविआचे रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल

हेही वाचा – कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी घरोघरी पैसे वाटले? रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप; म्हणाले…

बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध मोहिमेअंतर्गत महापालिकेने ही कारवाई केली आहे. काेणत्याही डॉक्टरने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतल्यावर त्याची नाेंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे करावी लागते. अशी नोंदणी नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणारे बाेगस डाॅक्टर, चुकीचे उपचार करणाऱ्या, अधिकृत नोंदणी नसणाऱ्या डॉक्टरांविरोधात नागरिक, संस्था महापालिकेकडे तक्रार करू शकतात. त्याबाबतची तक्रार दाखल झाल्यावर पडताळणी करून आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 16:37 IST
ताज्या बातम्या